CloudMessतुमची मेस. सोपी. English “Hii” पाठवा
CloudMess
WhatsApp वर फक्त “Hii” पाठवा

मेस ॲपची किंमत: 30 दिवस मोफत. मग महिन्याचा सोपा दर.

किंमत फक्त चालू प्लॅन असलेल्या सदस्यांच्या संख्येवर ठरते. प्रत्येक प्लॅनमध्ये सुविधा त्याच, आणि तुमच्या पैशांवर कमिशन नाही.

तीन प्लॅन. फरक फक्त सदस्यसंख्येचा.

  • स्टार्टर

    ₹499 दर महिना

    40 सदस्यांपर्यंत

  • ग्रोथ

    ₹999 दर महिना

    120 सदस्यांपर्यंत

  • प्रो

    ₹1,499 दर महिना

    250 सदस्यांपर्यंत

  • चालू प्लॅन असलेले सदस्य मोजले जातात: सुट्टीवर असलेले आणि प्लॅननंतरच्या बफर दिवसांत असलेलेही. प्लॅन आणि बफर दिवस दोन्ही संपले, की ते सदस्य मोजले जात नाहीत.
  • 6 महिन्यांचे एकदम भरले, तर 5 महिन्यांचेच पैसे. वर्षाचे एकदम भरले, तर 10 महिन्यांचेच.
  • 250 पेक्षा जास्त सदस्य? WhatsApp वर बोलूया.
  • काउंटर विक्री (काउंटरवर येणाऱ्या बाहेरच्या ग्राहकांना जेवण विकणं) हे वेगळं ॲड-ऑन आहे, आणि त्याची किंमत वेगळी आहे. त्यासाठी आम्हाला विचारा.

प्रत्येक प्लॅनमध्ये सगळं.

छोटी मेस असो की मोठी, ॲप तेच. कोणतीही सुविधा मोठ्या प्लॅनसाठी राखून ठेवलेली नाही; फक्त काउंटर विक्रीचं ॲड-ऑन वेगळं आहे.

  • QR ने जेवणाची नोंद: Live QR आणि छापलेला QR
  • थकबाकी, UPI लिंक आणि पावत्या
  • रात्री 11:30 ला उद्याची गणती
  • सुट्ट्या, मेस बंदचे दिवस आणि प्लॅन वाढवणं
  • टिफिन आणि पार्सल
  • मेनू, सूचना आणि रिपोर्ट
  • सदस्यांचं ॲप, Google Play वर मोफत
  • पुण्यात सेटअपसाठी आम्ही स्वतः येतो

मोफत 30 दिवस, आणि त्यानंतर

  • मेस सेट केल्याच्या दिवसापासून 30 दिवस मोफत. सुरुवातीला काहीच भरायचं नाही.
  • ते संपण्याआधी आम्ही आठवण करून देतो, आणि तुमच्या सदस्यसंख्येला कोणता प्लॅन बसतो, ते सांगतो.
  • तुम्ही “हो” म्हटलं, तरच पैसे भरायचा प्लॅन सुरू होतो. नाही म्हटलं, तर काहीच देणं नाही.
  • पैसे थेट इन्फिवर्क्सला भरायचे: UPI, बँक ट्रान्सफर किंवा रोख. बिल WhatsApp वर येतं. ॲपमधून कधीच पैसे घेतले जात नाहीत.
  • कधीही थांबवू शकता: फक्त आम्हाला सांगा. भरलेल्या कालावधीच्या शेवटपर्यंत सेवा चालू राहते; पैसे परत मिळत नाहीत.

तुमचे पैसे तुमचेच

सदस्यांचे पैसे थेट तुमच्या UPI वर किंवा हातात येतात. CloudMess त्यातून काहीच घेत नाही; आम्ही फक्त वर दिलेली महिन्याची किंमत घेतो.

आधीपासून CloudMess वापरताय?

तुमच्यासाठी आत्ता काहीच बदलत नाही. किंमत किंवा अटी बदलणार असतील, तर आम्ही आधी लेखी कळवू, WhatsApp किंवा ईमेलवर.

सविस्तर अटी: वापराच्या अटी (English)

पहिले 30 दिवस मोफत वापरून पाहा.

WhatsApp वर फक्त “Hii” पाठवा. आम्ही तुमच्या मेसमध्ये येऊन सगळं सेट करून देतो.

पहिले 30 दिवस मोफत. सेटअपसाठी आम्ही स्वतः येतो.