प्रत्येक जेवणाची नोंद
सदस्य QR स्कॅन करतात, आणि प्रत्येक जेवणाला टोकन — सदस्याच्या पावतीवर आणि तुमच्या यादीत तोच नंबर.
- Live QR — मिनिटभरापेक्षा जुना फोटो चालत नाही
- एका जेवणाला एकच स्कॅन
- फोन विसरला? तुम्ही हातानं नोंद करू शकता
CloudMess हे मेस आणि खानावळ चालवणाऱ्यांसाठीचं ॲप आहे. सदस्य जेवणाआधी QR स्कॅन करतात, आणि कोणी जेवलं, कोणाचे पैसे बाकी आहेत आणि उद्या किती जण जेवणार, हे तुम्हाला एका स्क्रीनवर दिसतं. पैसे थेट तुमच्या UPI वर, कमिशन नाही.
पहिले 30 दिवस मोफत. सेटअपसाठी आम्ही स्वतः येतो.
किंवा फोन करा: +91 74834 01547
वहीतल्या खुणा, कार्ड पंचिंग आणि WhatsApp वरचे निरोप. महिनाअखेरीस हिशोब जुळवणं हेच एक काम होऊन बसतं.
कार्ड पंचिंग, वहीतल्या खुणा आणि महिनाअखेरीस “फक्त 20 दिवसच जेवण झालं” हा वाद.
लक्षात ठेवायचं, पुन्हा पुन्हा विचारायचं, आणि “मी दिले होते” ऐकायचं.
अंदाजाने स्वयंपाक. कधी कमी पडतं, कधी उरतं.
फोन, WhatsApp आणि आठवणींवर चालणारा गोंधळ.
नावे आणि आकडे उदाहरणासाठी.
जेवण, पैसे, उद्याची गणती आणि सुट्ट्या. वहीऐवजी एक ॲप, आणि मालक-सदस्य दोघांना एकच आकडा.
सदस्य QR स्कॅन करतात, आणि प्रत्येक जेवणाला टोकन — सदस्याच्या पावतीवर आणि तुमच्या यादीत तोच नंबर.
कोणाचे किती बाकी — एका स्क्रीनवर. पैसे थेट तुमच्या खात्यात; आम्ही फक्त नोंद ठेवतो.
रोज संध्याकाळी ॲप सदस्यांना एकच प्रश्न विचारतं: उद्या जेवणार का? रात्री 11:30 ला उद्याची गणती तुमच्या फोनवर — नॉनवेज दिवशी वेज आणि नॉनवेज वेगळी.
सदस्य ॲपमधून सुट्टी मागतात, तुम्ही तुमच्या नियमांनुसार मंजूर करता. पूर्ण दिवस मेस बंद जाहीर केला, की तो दिवस प्रत्येक प्लॅनमध्ये आपोआप जोडला जातो.
जो आकडा मालकाला दिसतो, तोच सदस्याला — किती जेवणं झाली, किती पैसे भरले, किती दिवस उरले. पैशांवरून वाद नको.
मालकाच्या फोनवर
सदस्याच्या फोनवर
CloudMess रात्रभर काय काय करतं, ते पाहा.
उद्याची गणती तुमच्या फोनवर
वेज आणि नॉनवेज वेगळी, टिफिनसहप्लॅन योग्य दिवशी सुरू आणि बंद, आणि सकाळसाठी टिफिनची यादी तयार
जे “नाही” म्हणाले, त्यांना वगळूनसर्व्हेची वेळ (डिफॉल्ट 8–10 PM) तुम्ही बदलू शकता.
हिशोब आमचा. तुम्ही निश्चिंत.
तीन पायऱ्या. सेटअपला साधारण पाच मिनिटं लागतात, आणि तेही आम्ही तुमच्यासोबत करतो.
आम्ही उत्तर देतो आणि तुमच्या सोयीच्या वेळी भेट ठरवतो.
ॲप तुमच्या फोनवर, तुमचे प्लॅन तुमच्या नावांनी, QR काउंटरवर.
तुम्ही मंजूर केलं की त्यांचा प्लॅन सुरू. किंवा त्यांचा नंबर तुम्हीच आधी जोडा.
(मेस कोड उदाहरणासाठी)
“पुण्यात शिकताना रोजचं जेवण मेसचंच. कार्ड पंचिंग, वहीतल्या खुणा, हिशोबावरून वाद, उरलेलं अन्न — हे सगळं जवळून पाहिलं. म्हणून CloudMess बनवलं: मेस चालवणाऱ्यांसाठी, आणि तिथे जेवणाऱ्यांसाठी.”
नाही. रोख तुमच्या हातात, आणि UPI थेट तुमच्या खात्यात. CloudMess फक्त नोंद ठेवतं; पैसे कधीच आमच्यामार्फत जात नाहीत.
पहिले 30 दिवस मोफत. त्यानंतर चालू प्लॅन असलेल्या सदस्यांच्या संख्येनुसार दर महिना: 40 सदस्यांपर्यंत ₹499, 120 पर्यंत ₹999 आणि 250 पर्यंत ₹1,499. प्रत्येक प्लॅनमध्ये सुविधा त्याच (काउंटरवर येणाऱ्या बाहेरच्या ग्राहकांसाठीची काउंटर विक्री हे वेगळ्या किमतीचं ॲड-ऑन आहे), आणि तुमच्या पैशांवर कमिशन नाही. 30 दिवसांनंतर तुम्ही “हो” म्हटलं, तरच पैसे भरायचा प्लॅन सुरू होतो. सविस्तर: किंमत.
सदस्यांना रोज काहीच करायचं नसतं — फक्त जेवणाआधी QR स्कॅन. उद्या येणार नसतील तर रात्री ॲपमध्ये सांगायचं. सदस्यांचं ॲप Google Play वर मोफत आहे.
सेटअप आम्ही तुमच्यासोबत बसून करतो. नंतर रोज एकच स्क्रीन पाहायची — मेसेज पाहिल्यासारखी.
छापील QR असेल तर सदस्याचा स्कॅन फोनमध्येच साठवला जातो आणि नेट आलं की नोंद होते. मालकाच्या ॲपला मात्र नेट लागतं.
WhatsApp वर फक्त “Hii” पाठवा. आम्ही तुमच्या मेसमध्ये येऊन सगळं सेट करून देतो.
पहिले 30 दिवस मोफत. सेटअपसाठी आम्ही स्वतः येतो.