CloudMessतुमची मेस. सोपी. English “Hii” पाठवा
CloudMess
WhatsApp वर फक्त “Hii” पाठवा

प्रश्नोत्तरे

विचारायचं असलेलं सगळं.

मेस मालक आणि सदस्य नेहमी विचारतात ते प्रश्न. इथे उत्तर मिळालं नाही, तर WhatsApp वर थेट विचारा.

मेस मालकांसाठी

तुम्ही पैशातून कमिशन घेता का?

नाही. रोख तुमच्या हातात, आणि UPI थेट तुमच्या खात्यात. CloudMess फक्त नोंद ठेवतं; पैसे कधीच आमच्यामार्फत जात नाहीत.

सदस्य ॲप वापरतील का?

सदस्यांना रोज काहीच करायचं नसतं — फक्त जेवणाआधी QR स्कॅन. उद्या येणार नसतील तर रात्री ॲपमध्ये सांगायचं. सदस्यांचं ॲप Google Play वर मोफत आहे.

मला हे जमेल का?

सेटअप आम्ही तुमच्यासोबत बसून करतो. नंतर रोज एकच स्क्रीन पाहायची — मेसेज पाहिल्यासारखी.

नेट नसेल तर?

छापील QR असेल तर सदस्याचा स्कॅन फोनमध्येच साठवला जातो आणि नेट आलं की नोंद होते. मालकाच्या ॲपला मात्र नेट लागतं.

किंमत किती?

सध्या पायलट सुरू आहे, म्हणून मोफत. किंमत ठरेल तेव्हा ती आधी स्पष्ट सांगू; त्यानंतर पुढे जायचं की नाही, ते तुम्ही ठरवा.

दुसऱ्या मेसला माझे सदस्य दिसतील का?

नाही. प्रत्येक मेसचा डेटा वेगळा आहे — ॲप दाखवत नाही म्हणून नाही, तर सर्व्हरच दुसऱ्या मेसला परवानगी देत नाही.

सदस्य कसे जॉइन होतात?

तुमचा 6 अक्षरी मेस कोड ते ॲपमध्ये टाकतात, आणि तुम्ही मंजूर केलं की त्यांचा प्लॅन सुरू होतो. किंवा त्यांचा नंबर तुम्ही आधीच जोडू शकता; मग त्यांना कोडही लागत नाही.

मालकांचं ॲप कुठे मिळेल?

मालकांचं ॲप (फोनवर त्याचं नाव “CM Owner” असतं) आम्ही सेटअप भेटीत तुमच्या फोनवर इन्स्टॉल करून देतो, आणि तुमचं खातंही तेव्हाच तयार करतो. त्यासाठी WhatsApp वर “Hii” पाठवा.

आमच्याकडे टिफिनही जातात. चालेल का?

हो. टिफिन सदस्यांना स्कॅन करायची गरज नसते. रोज रात्रीच दुसऱ्या दिवसाची टिफिनची यादी तयार होते — जे “नाही” म्हणाले, त्यांना वगळून — आणि पॅक झाला, पाठवला हे तुम्ही ॲपमध्ये मार्क करता. पाठवलेला टिफिन त्या सदस्याचं जेवण म्हणून मोजला जातो.

माझी मेस लहान आहे. उपयोग होईल का?

20 सदस्य असले तरी हिशोब तोच. उलट, लहान मेसला एक बुडलेली उधारीसुद्धा जास्त जाणवते.

माझा डेटा सुरक्षित आहे का?

तुमच्या मेसचा डेटा दुसऱ्या मेसला दिसत नाही, आणि सदस्यांना एकमेकांचे फोन नंबर दिसत नाहीत. मुख्य डेटाबेस भारतात, मुंबईत आहे. आम्ही डेटा विकत नाही आणि जाहिरातींसाठी वापरत नाही. सविस्तर: Privacy Policy.

iPhone वर चालतं का?

सध्या फक्त Android फोनवर (साधारण 2018 नंतरचे फोन).

CloudMess काय करत नाही?

पैसे गोळा करत नाही — पैसे थेट तुमच्याकडे येतात. SMS किंवा WhatsApp वर सूचना पाठवत नाही; सूचना ॲपमध्ये येतात. iPhone ॲप नाही, आणि कर्मचाऱ्यांसाठी वेगळं लॉगिन नाही. हे आधीच सांगितलेलं बरं, म्हणजे नंतर आश्चर्य नको.

सदस्यांसाठी

ॲप कुठे मिळेल?

Google Play वर “CloudMess” शोधा, किंवा या पानावरच्या Google Play बटणावर टॅप करा. सदस्यांसाठी मोफत. Android फोनवर चालतं (साधारण 2018 नंतरचे फोन).

माझ्या मेसमध्ये जॉइन कसं व्हायचं?

मोबाईल नंबर आणि OTP ने लॉगिन करा, तुमचं नाव टाका, आणि मेस मालकांनी दिलेला 6 अक्षरी मेस कोड टाका. मालकांनी मंजूर केलं की तुम्ही आत. मालकांनी तुमचा नंबर आधीच जोडला असेल, तर कोडही लागत नाही.

रोज सर्व्हे भरावा लागतो का?

उद्या जेवणार नसाल, तेव्हा संध्याकाळी ॲपमध्ये सांगा — एवढंच. उत्तर न देणाऱ्यांना कसं मोजायचं, ते तुमची मेस ठरवते; शंका असेल तर मेस मालकांना विचारा. एक वेळच्या Flexible प्लॅनवर काही सांगायचं नसतं — आल्यावर फक्त स्कॅन करा.

फोन विसरलात तर?

मेस मालक तुमचं जेवण हातानं नोंदवू शकतात, आणि ती नोंद तुमच्या ॲपमध्ये दिसते.

गावी जाताय, तर जेवणाचे दिवस?

ॲपमधून सुट्टीची विनंती करा. मालकांनी मंजूर केली की तुमचा प्लॅन थांबतो. परत आल्यावर मालक प्लॅन पुन्हा सुरू करतात, आणि मेसच्या नियमानुसार दिवस प्लॅनमध्ये जोडले जातात.

मेस बंद असेल तर माझा दिवस वाया जातो का?

नाही. मेसने ॲपमध्ये पूर्ण दिवस बंद जाहीर केला, तर तो दिवस तुमच्या प्लॅनमध्ये आपोआप जोडला जातो.

पैसे ॲपमधून भरता येतात का?

मेसने UPI ID दिला असेल, तर ॲपमधून थेट तुमचं UPI ॲप उघडतं आणि पैसे थेट मेसला जातात. मालकांनी पैसे नोंदवले की तुम्हाला पावती मिळते. CloudMess पैसे हाताळत नाही.

माझं पार्सल मित्र घेऊ शकतो का?

हो, मेसने पार्सल चालू ठेवले असतील तर. पार्सल मागा आणि “मित्राला पाठवा” वापरा; मित्र कोड दाखवून पार्सल घेतो.

माझा नंबर इतर सदस्यांना दिसतो का?

नाही. इतर सदस्यांना तुमचा नंबर दिसत नाही. आम्ही डेटा विकत नाही.

मी ॲप आधी वेबसाइटवरून घेतलं होतं. आता काय?

आधी नेट चालू करून जुनं ॲप एकदा उघडा, म्हणजे नेट नसताना केलेले स्कॅन पाठवले जातील. मग Google Play ते ॲप अपडेट करू शकलं नाही, तर ते काढून टाका, Google Play वरून CloudMess पुन्हा इन्स्टॉल करा आणि त्याच नंबरने लॉगिन करा. तुमची जेवणं आणि पैशांची नोंद सर्व्हरवर असते.

माझं वय 18 पेक्षा कमी आहे.

CloudMess फक्त 18 किंवा त्याहून जास्त वयाच्या लोकांसाठी आहे. 18 पेक्षा कमी वय असेल तर ॲपवर खातं उघडू नका; मेस मालकांना तुमची नोंद CloudMess बाहेर (उदा. वहीत) ठेवायला सांगा.

खातं डिलीट कसं करायचं?

ॲपमध्ये Profile & Settings मध्ये “माझं account delete करा” आहे, किंवा cloudmess.in/delete-account वरची पद्धत वापरा. लॉगिनची गरज नाही; 30 दिवसांत काम पूर्ण होतं.

Google Play वर ते मिळवा

सदस्यांसाठी मोफत. Android फोनवर. वय 18+.

तुमचा प्रश्न इथे नाही?

WhatsApp वर “Hii” पाठवा आणि थेट विचारा. भेटीत आम्ही तुमच्या मेसनुसार उत्तर देतो.

पायलटसाठी मोफत. सेटअपसाठी आम्ही स्वतः येतो.