CloudMessतुमची मेस. सोपी. English “Hii” पाठवा
CloudMess
WhatsApp वर फक्त “Hii” पाठवा

मेस बिल फॉरमॅट · Mess bill format in Marathi: मोफत नमुना. छापा, किंवा Excel मध्ये भरा.

मेसच्या मासिक बिलात इतकं असलं की पुरे: सदस्याचं नाव, कालावधी, मासिक शुल्क, मागील थकबाकी, जादा खर्च, कपात, जमा रक्कम आणि शिल्लक. खालचा नमुना मोफत आहे: Excel मध्ये भरला तर बेरीज आपोआप होते, किंवा PDF छापून हातानं भरा.

नोंदणीची गरज नाही. Excel मध्ये 150 सदस्यांपर्यंत जागा. PDF मध्ये एका A4 पानावर दोन बिलं; मधून कापा.

बिलात काय काय हवं

या दहा नोंदी असल्या, की महिनाअखेरीस “मी पैसे दिले होते” या वादाला जागाच राहत नाही.

मेस बिलातल्या नोंदी आणि त्या का हव्यात
नोंदका हवी
मेसचं नाव, फोन आणि UPI IDसदस्याला कुठे आणि कसे पैसे भरायचे ते लगेच कळतं.
बिल क्रमांक आणि दिनांकनंतर शोधायला सोपं. एकाच क्रमांकाची दोन बिलं कधीच नकोत.
सदस्याचं नाव आणि मोबाईलएकाच नावाचे दोन सदस्य असले तरी गोंधळ नाही.
प्लॅन आणि कालावधी (पासून–पर्यंत)“मी 5 तारखेला आलो होतो” हा वाद संपतो. दोन वेळ, एक वेळ की टिफिन, तेही लिहा.
मासिक शुल्कठरलेली रक्कम, तोंडी नाही तर लेखी.
मागील थकबाकीमागच्या महिन्याची बाकी पुढे आणा, नाहीतर ती विसरली जाते.
जादा खर्चपाहुण्यांचं जेवण, पार्सल किंवा इतर काही. काय आणि किती, ते तपशिलात लिहा.
कपातसुट्टी किंवा मेस बंद असलेल्या दिवसांसाठी पैसे कमी करत असाल तरच. बऱ्याच मेस पैसे कमी न करता दिवस वाढवून देतात; तुमचा नियम आधीच सांगा.
एकूण देय, जमा आणि शिल्लकजमा रकमेसोबत तारीख आणि पद्धत (रोख की UPI) लिहा.
भरण्याची शेवटची तारीख आणि सही“पैसे 5 तारखेपर्यंत भरावेत” अशी एक ओळ, आणि मालकाची सही.

भरलेलं बिल कसं दिसतं

बेरीज अशी: मासिक शुल्क + मागील थकबाकी + जादा खर्च − कपात = एकूण देय. एकूण देय − जमा = शिल्लक.

  • Excel मध्ये ही बेरीज आपोआप होते; तुम्ही फक्त पिवळ्या रकान्यांत लिहा.
  • Excel मध्ये “सदस्य” पान आहे: सर्व सदस्यांची एका महिन्याची यादी, प्रत्येकाची शिल्लक, खाली एकूण, आणि रोख व UPI ची वेगळी बेरीज.
  • Google Sheets किंवा मोबाईलवरच्या Excel मध्येही उघडतं.
  • कोण किती जेवलं, ते मोजायला मोफत हजेरी रजिस्टर वापरा.

नमुना मेस

मासिक बिल · बिल क्र. 27 · दिनांक 01/10/2026

सदस्य
राहुल पाटील
प्लॅन
दोन वेळ
कालावधी
01/10 – 31/10/2026
मासिक शुल्क
₹3,000
मागील थकबाकी
₹400
जादा: पाहुण्यांचं जेवण (2 × ₹70)
₹140
कपात
₹0
एकूण देय
₹3,540
जमा (01/10, रोख)
₹2,000
शिल्लक
₹1,540

पैसे 5 तारखेपर्यंत भरावेत. UPI: yourmess@bank

उदाहरण: मेसचं नाव, सदस्य आणि आकडे काल्पनिक आहेत.

हिशोबात नेहमी होणाऱ्या पाच चुका

  1. बिलाला क्रमांक नाही

    क्रमांक नसला की कोणतं बिल दिलं, कोणतं राहिलं, ते कळत नाही. 1 पासून क्रमाने लिहा.

  2. पैसे घेतले, पावती नाही

    रोख असो की UPI, प्रत्येक रकमेची तारखेसह नोंद ठेवा, आणि सदस्याला पावती द्या. वाद तिथेच संपतो.

  3. थकबाकी पुढे नेली नाही

    मागच्या महिन्याची बाकी नव्या बिलावर आली नाही, की ती बहुतेक बुडते.

  4. सुट्टीचा नियम तोंडी

    किती दिवसांच्या सुट्टीला दिवस परत मिळतात, ते लिहून मेसमध्ये लावा. महिनाअखेरीस नियम बदलले, असं वाटायला नको.

  5. रोख आणि UPI एकत्र

    दोन्ही वेगळ्या लिहिल्या, की महिन्याच्या शेवटी हातातली रोकड आणि बँकेतली UPI रक्कम पटकन ताडून पाहता येते.

हे बिल दर महिन्याला हातानं बनवायचं नसेल तर

CloudMess हे मेस ॲप पैशांचा आणि जेवणाचा हिशोब तुमच्यासाठी ठेवतं:

  • प्रत्येक सदस्याची थकबाकी एका स्क्रीनवर; संपलेल्या प्लॅनची बाकीही यादीत राहते
  • बाकी असणाऱ्यांना UPI लिंक; पैसे थेट तुमच्या खात्यात, कमिशन नाही
  • पैसे नोंदवले की सदस्याला पावती, आणि सदस्याच्या फोनवरही तोच आकडा (सदस्य ॲप वापरत असेल तर)
  • कोण कोणत्या दिवशी जेवलं, त्याची QR स्कॅनने नोंद

CloudMess काय काय करतं · किंमत: पहिले 30 दिवस मोफत

नेहमीचे प्रश्न

बिलावर GST लावायचा का?

हा नमुना GST जोडत नाही. तुमची मेस GST साठी नोंदणीकृत असेल, तर बिलावर काय लिहायचं, ते तुमच्या CA ला विचारा.

बिल आणि पावती यात फरक काय?

बिल सांगतं किती देणं आहे; पावती सांगते किती मिळाले. दोन्ही द्या: महिन्याच्या सुरुवातीला बिल, आणि पैसे मिळाले की पावती.

मोबाईलवर Excel भरता येईल का?

हो. Google Sheets किंवा Microsoft Excel ॲपमध्ये फाइल उघडा; बेरीज तिथेही आपोआप होते.

बिलं नकोत, थेट हिशोब हवा?

WhatsApp वर “Hii” पाठवा. पुण्यात आम्ही तुमच्या मेसमध्ये येऊन CloudMess सेट करून देतो.

पहिले 30 दिवस मोफत. सेटअपसाठी आम्ही स्वतः येतो.