आमच्याबद्दल
मेसचं जेवण खाल्लं, म्हणून हे बनवलं.
“पुण्यात शिकताना रोजचं जेवण मेसचंच. कार्ड पंचिंग, वहीतल्या खुणा, हिशोबावरून वाद, उरलेलं अन्न — हे सगळं जवळून पाहिलं. म्हणून CloudMess बनवलं: मेस चालवणाऱ्यांसाठी, आणि तिथे जेवणाऱ्यांसाठी.”
नावे आणि आकडे उदाहरणासाठी
मेसचा खरा त्रास: अंदाज
मेस चालवणं म्हणजे रोज शेकडो छोटे हिशोब: कोण जेवलं, कोणी पैसे दिले, उद्या किती जण येणार, कोण गावी गेलं. वही, कार्ड, WhatsApp आणि आठवणीत विखुरलेले हे हिशोब महिनाअखेरीस वादात बदलतात, आणि स्वयंपाक अंदाजावर होतो.
CloudMess हे सगळे हिशोब एका ठिकाणी ठेवतं, आणि मालक आणि सदस्य दोघांना तोच आकडा दाखवतं. स्वयंपाक, माणसं आणि मेसची चव — ते तुमचं काम. हिशोब आमचा.
अंदाज नको, आकडा हवा.
आमची चार वचनं
पैसे थेट तुमच्याकडे
आम्ही पैसे हाताळत नाही आणि कमिशन घेत नाही. आम्ही फक्त नोंद ठेवतो.
तुमचा डेटा तुमच्या मेसचा
दुसऱ्या मेसला तो दिसत नाही, आणि आम्ही तो विकत नाही.
आम्ही स्वतः येतो
सेटअप तुमच्या मेसमध्ये, तुमच्यासोबत बसून. एखादं ॲप फक्त डाउनलोड करायला सांगत नाही.
दोघांना एकच आकडा
पावती, टोकन आणि दिवसवार इतिहास मालक आणि सदस्य दोघांकडे. वाद झाला तर ॲप उघडा.
कंपनी
CloudMess हे इन्फिवर्क्स टेक्नॉलॉजीज प्रायव्हेट लिमिटेड (InfiWorks Technologies Private Limited) या भारतात नोंदणीकृत कंपनीचं उत्पादन आहे. नोंदणीकृत कार्यालय बीड, महाराष्ट्र इथे आहे, आणि आम्ही पुण्यातील मेससोबत काम करतो.
लहान व्यवसायांसाठी, साध्या फोनवर चालणारं, मराठी, हिंदी आणि English मधलं सॉफ्टवेअर बनवणं हे InfiWorks चं काम आहे. CloudMess हे त्यातलं पहिलं ॲप.
- कंपनीचं नाव
- INFIWORKS TECHNOLOGIES PRIVATE LIMITED
- CIN
- U62090ME2026PTC476551
- नोंदणीकृत कार्यालय
- At 438, Shidod, Shidode, Bid, Beed – 431122, Maharashtra, India
- संपर्क
- +91 74834 01547 · contact@infiworks.co.in
नमस्कार! मी ढगू.
पुण्याच्या मेसचा हिशोब ठेवणं हे माझं काम.
ढगू म्हणजे CloudMess च्या लोगोमधला छोटा ढग. ढगूची दोन रूपं: हात हलवणारं “Hii” स्वागतासाठी, आणि गॉगल लावलेलं “Cool” रात्रीच्या हिशोबासाठी.
पहिला आठवडा वहीसोबत चालवून पाहा.
WhatsApp वर फक्त “Hii” पाठवा. आम्ही तुमच्या मेसमध्ये येऊन सगळं सेट करून देतो.
पायलटसाठी मोफत. सेटअपसाठी आम्ही स्वतः येतो.