CloudMessतुमची मेस. सोपी. English “Hii” पाठवा
CloudMess
WhatsApp वर फक्त “Hii” पाठवा

मेस व्यवसाय मार्गदर्शक · How to start a mess business: मेस (खानावळ) कशी सुरू करावी? 2026 साठी सात पायऱ्या.

मेस (खानावळ) व्यवसाय सुरू करायचा आहे? थोडक्यात: जवळपास कोण रोज जेवायला येईल ते पाहा, प्लॅन आणि मेनू ठरवा, स्वतःच्या खर्चावरून दर काढा, FSSAI नोंदणी करा आणि शॉप ॲक्टखाली ऑनलाइन सूचना (इंटिमेशन) द्या, स्वयंपाकघर तयार करा, नियम लिहून लावा, आणि पहिले 30 सदस्य जोडा.

FSSAI, शॉप ॲक्ट आणि GST च्या गोष्टी सरकारी स्रोतांवरून तपासल्या आहेत. शेवटची तपासणी: 11 ऑक्टोबर 2026.

1. आधी ग्राहक, मग जागा

मेस चालते ती रोज येणाऱ्या सदस्यांवर. म्हणून आधी पाहा, जवळपास कोण रोज जेवायला येईल: कॉलेज आणि हॉस्टेलचे विद्यार्थी, PG मध्ये राहणारे, ऑफिसमधले कर्मचारी.

  • आसपासच्या दोन-तीन मेसमध्ये जेवून पाहा: दर, वेळा, चव, आणि लोकांच्या तक्रारी काय आहेत.
  • दहा संभाव्य सदस्यांशी बोला: त्यांना किती पैसे परवडतात, कोणत्या वेळा हव्यात, डबा हवा का.
  • जागा अशी निवडा, की सदस्यांना चालत येता येईल.
  • घरून सुरू करत असाल, तर सोसायटी किंवा घरमालकाची परवानगी आधीच घ्या.

2. प्लॅन आणि मेनू ठरवा

बहुतेक मेस महिन्याच्या प्लॅनवर चालतात. सुरुवातीला दोन-तीनच प्लॅन ठेवा, म्हणजे हिशोब सोपा राहतो.

  • दोन वेळचं जेवण (दुपारी आणि रात्री), एक वेळचं जेवण, आणि हवं असल्यास डबा (टिफिन).
  • आठवड्याचा मेनू ठरवून लावा; नॉनवेज कोणत्या दिवशी, ते आधीच सांगा.
  • जेवणाच्या वेळा ठरवा, आणि रविवार किंवा सणाच्या दिवशी मेस चालू की बंद, तेही ठरवा.

3. स्वतःच्या खर्चावरून दर ठरवा

दर शेजारच्या मेसवरून नाही, तुमच्या खर्चावरून ठरवा. महिन्याचा सगळा खर्च लिहा: धान्य, डाळी, तेल, भाज्या, दूध, गॅस, जागेचं भाडं, स्वयंपाकी आणि मदतनीसांचा पगार, तुमचा स्वतःचा पगार, वीज आणि पाणी, डबे किंवा पॅकिंग, आणि इतर छोटे खर्च. हे आकडे म्हणजेच तुमच्या मेस बिझनेस प्लॅनचा पाया.

एका ताटाचा खर्च = महिन्याचा एकूण खर्च ÷ महिन्यात दिलेली ताटं

सदस्याचा महिन्याचा दर = एका ताटाचा खर्च × त्याची महिन्याची ताटं + तुमचा नफा

उदाहरण (आकडे काल्पनिक; तुमचे स्वतःचे आकडे वापरा)
सदस्य40, दोन वेळ, 30 दिवस = 2,400 ताटं
महिन्याचा एकूण खर्च (तुमच्या स्वतःच्या पगारासह)₹1,20,000
एका ताटाचा खर्च₹1,20,000 ÷ 2,400 = ₹50
एका सदस्याचा खर्च60 ताटं × ₹50 = ₹3,000
दर ₹3,300 ठेवला तरएका सदस्यामागे ₹300, म्हणजे महिन्याला ₹12,000 नफा
  • सदस्य सुट्टी घेतात आणि सगळे रोज जेवत नाहीत. म्हणून प्रत्यक्ष किती ताटं गेली, ते मोजा: मोफत हजेरी रजिस्टर.
  • संदर्भासाठी: सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या कॅम्पस मेसमध्ये 1 ऑक्टोबर 2026 पासून मासिक सदस्यांसाठी मर्यादित शाकाहारी जेवणाचा दर ₹48 आहे (इतरांसाठी ₹57). स्रोत [9]

4. परवाने आणि नोंदणी

शेवटची तपासणी: 11 ऑक्टोबर 2026. नियम बदलू शकतात; अर्ज करण्याआधी अधिकृत पोर्टलवर एकदा पाहा. हा कायदेशीर सल्ला नाही.

FSSAI नोंदणी (ज्याला “फूड लायसन्स” म्हणतात)

1 एप्रिल 2026 पासून बेसिक नोंदणीसाठी (Registration) वर्षाच्या उलाढालीची मर्यादा ₹1.5 कोटी आहे; आधी ती ₹12 लाख होती. स्रोत [1]स्रोत [2]

ही मर्यादा Restaurants, Food Vending Establishment अशा प्रकारांना लागू आहे. “Caterer” हा प्रकार निवडला, तर उलाढाल कितीही असली तरी स्टेट लायसन्स लागतं. स्रोत [3]

नोंदणी आता पुन्हा पुन्हा नूतनीकरण न करता कायम राहते; तपासण्या मात्र होऊ शकतात. स्रोत [1]स्रोत [2]

अर्ज FoSCoS पोर्टलवर करा (foscos.fssai.gov.in). त्याच्या यादीत नोंदणीसाठी ₹100 फी दाखवली आहे. व्यवसायाचा प्रकार काळजीपूर्वक निवडा; शंका असेल तर FoSCoS हेल्पडेस्कला विचारा. स्रोत [3]

शॉप ॲक्ट (महाराष्ट्र)

10 पेक्षा कमी कामगार असतील, तर फक्त ऑनलाइन इंटिमेशन (सूचनापत्र, Form F) भरायचं; त्याची पावती (Form G) पोर्टलवर लगेच मिळते. 10 किंवा जास्त कामगार असतील, तर नोंदणी (Form A) लागते. स्रोत [4]स्रोत [5]

या कायद्यात कोणतीही फी ठरवलेली नाही; फक्त ऑनलाइन सेवा शुल्क भरावं लागतं. पोर्टल: lms.mahaonline.gov.in. स्रोत [4]स्रोत [5]

GST

GST मध्ये मेसची सेवा “रेस्टॉरंट सेवा” मानली जाते. हॉटेलबाहेरच्या (स्टँड-अलोन) मेसला 5% GST लागतो, इनपुट टॅक्स क्रेडिटशिवाय. स्रोत [6]स्रोत [7]

वर्षाची उलाढाल ₹20 लाखांपेक्षा जास्त झाली, तर GST नोंदणी बंधनकारक होते. तुम्हाला नेमकं काय लागू होतं, ते तुमच्या CA ना विचारा. स्रोत [8]

महापालिका

काही महापालिका खाद्यपदार्थ विकणाऱ्या जागांसाठी स्वतःचा परवाना मागतात. तुमच्या वॉर्ड ऑफिसला एकदा विचारा. (हे आम्ही तपासलेलं नाही.)

5. स्वयंपाकघर तयार करा

  • व्यावसायिक (कमर्शियल) गॅस कनेक्शन
  • मोठी भांडी, झाकणाचे डबे आणि फ्रीज
  • पिण्याचं शुद्ध पाणी आणि हात धुण्याची जागा
  • ताटं, वाट्या, ग्लास; डबा देणार असाल तर डबे
  • रोजची साफसफाई, कीटक नियंत्रण, आणि स्वयंपाक करणाऱ्यांसाठी टोपी व ॲप्रन
  • प्रथमोपचार पेटी आणि आग विझवण्याचं उपकरण

6. नियम लिहून लावा

बहुतेक वाद नियम फक्त तोंडी असल्यामुळे होतात. हे लिहून मेसमध्ये लावा:

  • पैसे कधी भरायचे (उदा. महिन्याच्या 5 तारखेपर्यंत), आणि आगाऊ रक्कम किती
  • सुट्टीचा नियम: किती दिवस सुट्टी घेतली तर ते दिवस परत मिळतात
  • मेस बंदचे दिवस, आणि पाहुण्यांच्या जेवणाचा दर
  • जेवणाच्या वेळा

हजेरी आणि बिलासाठी आमचे मोफत नमुने: हजेरी रजिस्टर आणि मेस बिल.

7. पहिले 30 सदस्य

  • जवळच्या हॉस्टेल, PG आणि कॉलेजची यादी करा; वॉर्डन किंवा मालकांशी बोला.
  • एक दिवस मोफत जेवण चाखायला द्या; ते जेवण सर्वात चांगलं द्या.
  • मेनू, दर आणि पत्ता असलेला एक छोटा WhatsApp मेसेज पाठवा, आणि लोकांना तो पुढे पाठवायला सांगा.
  • Google Maps वर तुमच्या मेसची नोंद करा (Google Business Profile); विद्यार्थी “mess near me” असं शोधतात.
  • मित्र घेऊन येणाऱ्या पहिल्या सदस्यांना छोटी सूट द्या.
  • पहिल्या महिन्यात चव आणि वेळा रोज सारख्या ठेवा; सदस्य टिकतात ते त्यामुळेच.

पहिल्या दिवसापासून हिशोब नीट

CloudMess हे मेस ॲप नवीन मेससाठीही आहे:

  • सदस्य जेवणाआधी QR स्कॅन करतात; हजेरी आपोआप
  • थकबाकी एका स्क्रीनवर, UPI लिंकसह; पैसे थेट तुमच्याकडे, कमिशन नाही
  • रात्री 11:30 ला उद्याची गणती, म्हणजे अंदाजाने स्वयंपाक नाही
  • सुट्टीच्या विनंत्या, तुमच्या नियमांनुसार

CloudMess काय काय करतं · किंमत: पहिले 30 दिवस मोफत

नेहमीचे प्रश्न

मेस सुरू करायला किती पैसे लागतात?

ते जागा, सदस्यसंख्या आणि सामानावर अवलंबून असतं. एकदाचा खर्च (गॅस कनेक्शन, भांडी, फ्रीज, डिपॉझिट) आणि महिन्याचा खर्च (धान्य, भाज्या, गॅस, भाडं, पगार) वेगवेगळा लिहा, आणि पहिल्या दोन महिन्यांचा खर्च हातात ठेवा.

घरून मेस चालवता येते का?

हो, अनेक मेस घरून चालतात. तरीही FSSAI नोंदणी (किंवा लायसन्स) लागतंच, आणि सोसायटी किंवा घरमालकाची परवानगी आधीच घ्या. शॉप ॲक्टची सूचना तुम्हाला लागू होते का, ते कामगार कार्यालयात विचारा.

मेस व्यवसायात नफा किती होतो?

ठरलेला आकडा नाही; तो सदस्यसंख्या, दर आणि खर्चावर ठरतो. वरच्या पद्धतीने तुमचा दर काढा, आणि दर महिन्याला खर्च आणि ताटं मोजा.

नवीन मेस सुरू करताय?

WhatsApp वर “Hii” पाठवा. पुण्यात आम्ही तुमच्या मेसमध्ये येऊन CloudMess सेट करून देतो; पहिले 30 दिवस मोफत.

पहिले 30 दिवस मोफत. सेटअपसाठी आम्ही स्वतः येतो.