सदस्यांसाठी
स्कॅन करा. जेवा. बिनधास्त.
किती जेवणं झाली, किती उरली, थकबाकी किती — सगळं तुमच्या फोनवर. रोज फक्त जेवणाआधी QR स्कॅन.
सदस्यांसाठी मोफत. Android फोनवर. वय 18+.
मेस चालवता? मालकांसाठीची माहिती इथे
रोज काय करायचं?
जेवणार असाल तर जवळजवळ काहीच नाही. काउंटरवर एवढंच:
- 1
ॲप उघडा आणि “Scan करून जेवण log करा” दाबा
- 2
काउंटरवरचा QR स्कॅन करा
फोन “धन्यवाद” म्हणतो, आणि पावती येते.
- 3
पावतीवरचा टोकन नंबर मालकांना दाखवा
तोच टोकन नंबर मालकांच्या यादीत असतो. पावती लगेच दाखवा — ती थोड्याच वेळासाठी वैध असते.
उद्या जेवणार नसाल, तर आज संध्याकाळी ॲपमध्ये सांगा. मेसला योग्य प्रमाणात स्वयंपाक करायला मदत होते.
ॲपमध्ये काय काय आहे
तुमचं जेवण, तुमचा हिशोब, तुमच्या फोनवर.
-
टोकनची पावती
स्कॅन झाला की फोनवर टोकन नंबर. तोच नंबर मालकांच्या यादीत, म्हणून नोंदीबद्दल शंका नाही.
-
किती उरलं ते रोज
किती जेवणं उरली आणि किती दिवस उरले. प्लॅन संपत आला की आकडा लाल होतो.
-
उद्या जेवणार का?
जेवणार नसाल तर काही टॅपमध्ये सांगा. मेसला योग्य प्रमाणात स्वयंपाक करता येतो.
-
सुट्टीची विनंती
गावी जाताय? ॲपमधून सुट्टी मागा; मेसच्या नियमानुसार दिवस परत.
-
पार्सल
उशीर होतोय? आज किंवा उद्यासाठी पार्सल मागा. मेस तयार करायला घेईपर्यंत रद्द करता येतं.
-
थकबाकी आणि UPI
किती बाकी ते पाहा. मेसचा UPI ID असेल तर तुमच्या UPI ॲपने थेट मेसला पैसे भरा.
आणखी 8 पाहा
-
दिवसवार इतिहास
प्रत्येक दिवस: खाल्ले, चुकले, मेस बंद, जोडलेले दिवस. मालकांनाही तोच इतिहास दिसतो.
-
मेस बंद? दिवस परत
मेसने ॲपमध्ये पूर्ण दिवस बंद जाहीर केला, तर तो दिवस तुमच्या प्लॅनमध्ये आपोआप जोडला जातो.
-
मित्राकडून पार्सल
“मित्राला पाठवा” वापरा; मित्र कोड दाखवून पार्सल घेतो.
-
टिफिनची स्थिती
टिफिन सदस्यांना स्कॅन करावा लागत नाही: टिफिन कधी पॅक झाला आणि कधी रवाना झाला, ते ॲपमध्ये दिसतं.
-
मेनू आणि सूचना
आजचा, उद्याचा आणि आठवड्याचा मेनू, आणि मेसच्या सूचना.
-
मालकांशी थेट संपर्क
मेसने नंबर दिला असेल, तर ॲपमधूनच फोन किंवा WhatsApp करा.
-
फोन विसरलात?
मालक तुमचं जेवण हातानं नोंदवू शकतात; ती नोंद तुमच्या ॲपमध्ये दिसते.
-
मराठी, हिंदी, English
लॉगिनच्या आधीच भाषा निवडा.
तुमच्या मेसमध्ये जॉइन कसं व्हायचं
- 1
- 2
मोबाईल नंबरने लॉगिन करा
SMS ने आलेला 6 अंकी OTP टाका. पासवर्ड लक्षात ठेवायची गरज नाही. OTP किंवा UPI PIN कोणालाही सांगू नका — CloudMess ते कधीच मागत नाही, आणि CloudMess ला पैसे भरायला कधीच सांगत नाही.
- 3
वय 18+ ची खात्री करा आणि नाव टाका
- 4
मेस कोड टाका
मेस मालकांनी दिलेला 6 अक्षरी कोड. मालकांनी मंजूर केलं की तुमचा प्लॅन दिसतो.
मालकांनी तुमचा नंबर आधीच जोडला असेल, तर मेस कोडही लागत नाही: लॉगिन केलं की थेट तुमची मेस.
मेसचे नियम
- जेवणाआधी QR स्कॅन करावा. कार्ड पंच करून मिळणार नाही.
- उद्या येणार नसाल, तर आज रात्रीच ॲपमध्ये सांगावे.
- पैसे भरल्याची पावती ॲपमध्ये मिळेल. वहीत शोधू नये.
- गावी जाताना सुट्टी ॲपमधूनच मागावी.
- मेसने पूर्ण दिवस बंद जाहीर केला, तर तो दिवस प्लॅनमध्ये आपोआप जोडला जाईल.
(वाद घालायचा असल्यास, आधी ॲपमधला हिशोब पाहावा.)
— व्यवस्थापनहिशोब: CloudMess
तुमची मेस अजून CloudMess वर नाही?
मेस मालकांना सांगा. तयार मेसेज WhatsApp वर पाठवा; बाकी आम्ही बघतो.
सदस्यांचे प्रश्न
ॲप कुठे मिळेल?
Google Play वर “CloudMess” शोधा, किंवा या पानावरच्या Google Play बटणावर टॅप करा. सदस्यांसाठी मोफत. Android फोनवर चालतं (साधारण 2018 नंतरचे फोन).
माझ्या मेसमध्ये जॉइन कसं व्हायचं?
मोबाईल नंबर आणि OTP ने लॉगिन करा, तुमचं नाव टाका, आणि मेस मालकांनी दिलेला 6 अक्षरी मेस कोड टाका. मालकांनी मंजूर केलं की तुम्ही आत. मालकांनी तुमचा नंबर आधीच जोडला असेल, तर कोडही लागत नाही.
रोज सर्व्हे भरावा लागतो का?
उद्या जेवणार नसाल, तेव्हा संध्याकाळी ॲपमध्ये सांगा — एवढंच. उत्तर न देणाऱ्यांना कसं मोजायचं, ते तुमची मेस ठरवते; शंका असेल तर मेस मालकांना विचारा. एक वेळच्या Flexible प्लॅनवर काही सांगायचं नसतं — आल्यावर फक्त स्कॅन करा.
फोन विसरलात तर?
मेस मालक तुमचं जेवण हातानं नोंदवू शकतात, आणि ती नोंद तुमच्या ॲपमध्ये दिसते.
गावी जाताय, तर जेवणाचे दिवस?
ॲपमधून सुट्टीची विनंती करा. मालकांनी मंजूर केली की तुमचा प्लॅन थांबतो. परत आल्यावर मालक प्लॅन पुन्हा सुरू करतात, आणि मेसच्या नियमानुसार दिवस प्लॅनमध्ये जोडले जातात.
मेस बंद असेल तर माझा दिवस वाया जातो का?
नाही. मेसने ॲपमध्ये पूर्ण दिवस बंद जाहीर केला, तर तो दिवस तुमच्या प्लॅनमध्ये आपोआप जोडला जातो.
पैसे ॲपमधून भरता येतात का?
मेसने UPI ID दिला असेल, तर ॲपमधून थेट तुमचं UPI ॲप उघडतं आणि पैसे थेट मेसला जातात. मालकांनी पैसे नोंदवले की तुम्हाला पावती मिळते. CloudMess पैसे हाताळत नाही.
माझं पार्सल मित्र घेऊ शकतो का?
हो, मेसने पार्सल चालू ठेवले असतील तर. पार्सल मागा आणि “मित्राला पाठवा” वापरा; मित्र कोड दाखवून पार्सल घेतो.
माझा नंबर इतर सदस्यांना दिसतो का?
नाही. इतर सदस्यांना तुमचा नंबर दिसत नाही. आम्ही डेटा विकत नाही.
मी ॲप आधी वेबसाइटवरून घेतलं होतं. आता काय?
आधी नेट चालू करून जुनं ॲप एकदा उघडा, म्हणजे नेट नसताना केलेले स्कॅन पाठवले जातील. मग Google Play ते ॲप अपडेट करू शकलं नाही, तर ते काढून टाका, Google Play वरून CloudMess पुन्हा इन्स्टॉल करा आणि त्याच नंबरने लॉगिन करा. तुमची जेवणं आणि पैशांची नोंद सर्व्हरवर असते.
माझं वय 18 पेक्षा कमी आहे.
CloudMess फक्त 18 किंवा त्याहून जास्त वयाच्या लोकांसाठी आहे. 18 पेक्षा कमी वय असेल तर ॲपवर खातं उघडू नका; मेस मालकांना तुमची नोंद CloudMess बाहेर (उदा. वहीत) ठेवायला सांगा.
खातं डिलीट कसं करायचं?
ॲपमध्ये Profile & Settings मध्ये “माझं account delete करा” आहे, किंवा cloudmess.in/delete-account वरची पद्धत वापरा. लॉगिनची गरज नाही; 30 दिवसांत काम पूर्ण होतं.
